KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेत विनापरीक्षा थेट संधी

 

KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेत विनापरीक्षा थेट संधी.


KDMC Recruitment 2022 :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २३ मार्च २०२२ आहे. 


एकूण जागा : - ०३


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 
१) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक :– ०१
शैक्षणिक पात्रता :- ०१) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. ०२) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.


२) सीनियर डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक  :-  ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) पदवीधर ०२) एनटीईपी अंतर्गत किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव किंवा पर्यवेक्षी क्षमतेमध्ये कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात ५ वर्षांचा अनुभव ०३) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०४) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी वाहन चालविण्यास सक्षम असावे.


३) टीबी हेल्थ व्हिजिटर :- ०१
शैक्षणिक पात्रता :
 विज्ञान विषयात पदवीधर किंवा इंटरमिजिएट (१०+२) आणि MPW/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र किंवा अनुभव.


वयो मर्यादा :- १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.


परीक्षा फी : फी नाही.


वेतनमान (Pay Scale) :-
१) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – २०,०००/-
२) सीनियर डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – २०,०००/-
३) टीबी हेल्थ व्हिजिटर- १५,५००/-


नोकरी ठिकाण :- कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)


निवड प्रक्रिया :- मुलाखतीद्वारे


मुलाखत दिनांक :२३ मार्च २०२२


" मुलाखतीचे ठिकाण :- आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंजारराव संकुल सुभाप मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता.कल्याण, जि.ठाणे. "


अधिकृत संकेतस्थळ :- www.kdmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा


Comments