भारतीय रिजर्व बैंक भरती
पदवीपर्यंत शिक्षण असणाऱ्यांसाठी खास संधी ,
एकूण जागा - 950
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मध्ये साहाय्यक या 950 पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
पदाचे नाव - साहाय्यक (RBI Assistant)
शैक्षणिक पात्रता -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया -
सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.
पगार -
उमेदवारांना 55700 रुपये वेतन दिले जाईल.
भरती शुल्क -
Gen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 450/- रुपये
SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी – 50/- रुपये
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर