MPSC RECRUITMENT 2022 BMC
- Get link
- X
- Other Apps
MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, तर लवकर अर्ज भरा.
MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022) आस्थापनेवरील सहायक आरोग्य अधिकारी, गट अ या संवर्गातील 7 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 पर्यंत आहे.
एकूण जागा : 07
पदाचे नाव :-
1) सहायक आरोग्य अधिकारी :-
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव :-
(1) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदावी (M.B.B.S.) आणि
(2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (M.D. – PSM) किंवा
(3) मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची सार्वजनिक आरोग्य मधील पदविका (DPH) किंवा
अनुभव: उपरोक्त अर्हता धारण केल्यानंतर शासनाच्या आरोग्य प्रशासनामधील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील जबाबदाराच्या पदावरी 5 वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा :- 1जुलै 2022 रोजी 18 ते 45 वर्षे पर्यंत.
परीक्षा फी :-
(एक) अराखीव (खुला) – रुपये 799/
(दोन) मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ- रुपये 449/
(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
पगार :- 67,700 ते 2,08,700 /
निवड प्रकिया :-
-प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
ठळक सूचना :-
जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
– चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
-चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
-मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाच्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
-सेवा भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवारील सहायक आरोग्य अधिकारी (सेवाप्रवेश नियम) 2019 अथवा तद्नंतर बृहन्मुंबई महापालिकेकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2022
अधिकृृतसंकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जासाठी :- येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर