COURT OF SMALL CAUSES MUMBAI RECRUITMENT 2022
मुंबईतील लघुबाद न्यायालयात 7 वी ते 10 वी पाससाठी नोकरीची संधी,तर लवकर अर्ज करा. नोकरीच्या शोधात असलेल्या 7 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी संधी चालून आलीय. लघुबाद न्यायालय, मुंबई येथे ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) ग्रंथपाल ( Librarian) - शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2) चौकीदार (Watchman) - शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शि...